Summary of the Book
आयुष्यात सुख, दुःख यांचे चक्र सतत सुरु असते, हे माहीत असूनही माणसाला सदासर्वदा सुखाची अपेक्षा असते. दुःख कोणालाही नको वाटते; पण वस्तूस्थिती तशी नसते म्हणून दुःख, अपयश, निराशा याने खचून न जाता आयुष्य सुंदर, सहज कसे जगता येईल याचा कानमंत्र जयप्रकाश झेंडे यांनी 'आयुष्य सुंदर करताना' मधून दिला आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे प्रत्येकाने आयुष्याचा वेगळा विचार कसा करावा, हे यात समजते. सुखाच्या सावलीसाठी दुःख सोसणे कसे सुसह्य होते, हे झेंडे यांनी सांगितले आहे.