नाटक उमल आणि उमज
Currently unavailable

 
Hard Copy Price: 25% OFF
R 120 R 90 / $ 1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
मराठी रंगभूमीला मोठ इतिहास आहे. संगीत नाटकापासून सामाजिक भान ठेवणारे, राजकीय अंगाने जाणारे, विनोदाचे वैविध्य दाखवणारे, इतिहासात डोकावून पाहणारे, वास्तवतेचे भान देणारे अशी अनेक नाटके दिग्गज रंगकर्मींच्या लेखणीतून, दिग्दर्शक, अभिनय, नेपथ्यातून वाचकांच्या भेटीस आली आहेत, येत आहेत. नाटकांचे दस्तऐवज ठरणारी स्मरणिका ‘रंगगंध’ काढली होती. ती आता ‘नाटक उमल आणि उमज’ या पुस्तकातून जतन करण्यात आली आहे. याचे संपादन डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी केले आहे.
    यामध्ये नाटक सादर होताना संहिता लेखनापासून सादर करायच्या सर्व पैलूंवर नाट्यकलावंतांचे लेख आहेत. रत्नाकर मतकरी यांनी नाटकाच्या जन्माची कथा, चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक उभे कसे करावे, डॉ. गिरीश ओक यांनी नाटकाचे अभिवचन, तर आनंद अभ्यंकर यांनी नाटक फुलवावे कसे, याबद्दल सांगितले आहे. नाटकातील संगीत, नेपथ्य, नाटक चालवावे कसे, या बरोबरच नाटक बघण्याच्या कलेविषयी यात मार्गदर्शन केले आहे. रंगगंध कलासक्त न्यास ही कला संस्था व राज्य नाट्य स्पर्धेच्या आठवणीही यात आहेत. यातील छोटेखानी लेख माहितीपूर्ण आहेत.

‘नाटक उमल आणि उमज’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5581402205461937514

या पुस्तकाबद्दलचे अशोक पत्की यांचे मनोगत जाणून घ्या https://youtu.be/Ha1r7G46N-c या व्हिडिओतून...

या पुस्तकाबद्दलचे रामदास कामत यांचे मनोगत जाणून घ्या https://youtu.be/ENh-HT6WMRU या व्हिडिओतून...
Book Review
Write a review

Abhijit Mone
30/06/2019

Pustak e-book swarupaat milel kai? Dhanyavaad
रमेश वाकनीस
26/06/2019

सर..खूप छान पुस्तक आहे.नाट्यक्षेत्रातील दिगजांचे,तुमचा,तुमच्या सहकारी मित्रांचे सर्वच लेख चांगले आहेत.रंगगंध या संस्थेचे कार्य त्यातले तुमचे,सर्व नाटकवेड्या कलाकारांचे योगदान केवळ कौतुकास्पद नाही तर नाट्यसंस्था स्थापन करु पाहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शकही आहे.फार पूर्वी आमच्या अॅक्टिव्ह थिएटर्स या संस्थेच्या स्थापनेला ग.वा.बेहरे आले होते.तेंव्हा ते म्हणाले होते,' कलाकारांच्या उन्मत्त अहंकारामुळे नाट्यसंस्था दुभंगतात.एखाद्या नाट्यसंहिते बाबत वैचारिक मतभेद झाले व एकाच्या दोन संस्था झाल्या तर ते स्वागतार्ह च म्हणावे लागेल पण कलाकारांचे रुसवेफुगवे छोटे मोठे मानपमान यामुळे एकाच्या दोन संस्था झाल्या तरी त्या टिकणे अवघड असते' ग.वां.च्या म्हणण्या मागे पीडीए तून थिएटर अॅकेडमीच्या उदयाचा संदर्भ होता.राज्य नाट्य स्पर्धा,औद्योगिक स्पर्धातील सहभागी संस्थांमधील चुरस ,सतत नवीन काहीतरी करत राहण्याची कलाकारांची धडपड,नाट्य परिक्षणे,नामांकित व अनुभवी परिक्षक, हे सगळे आता मागे पडले.एकदोन नाटकात बक्षीस मिळालं की लगेच सिरियल चित्रपटां मध्ये चमकायची पैसा मिळवायची ओढ लागलेले तरुणच जास्त दिसतात.काळाचा महिमा..दुसरं काय? पण रंगगंध सारख्य
Mukund Karambelkar
16/06/2019

हे नाट्यशास्त्राचे पाठ्यपुस्तक नव्हे तरीही ... नवीन नाट्यसंस्था सुरू करायची आहे ? नाटक बसवायचं (नाही...उभं करायचं) आहे ? जुन्या नाट्यसंस्थेला आपल्या कामाचं सिंहावलोकन करायचं आहे ? अनेक मान्यवर रंगकर्मिंनी स्वानुभवातून लिहिलेले उत्तम नाट्य निर्मितीसाठी दिशा देणारे लेख एका २४ वर्षे लहान शहरात चालू असलेल्या नाट्यसंस्थेतील सक्रिय कार्यकर्त्यांचे व्यवस्थापनाचे जिवंत अनुभव त्याच संस्थेतील रंगकर्मीनी स्वत: समृद्ध होण्यासाठी नाट्यानुभवाचा त्यांना मिळालेल्या शिदोरीचा दिलेला लेखाजोखा कोणत्याही नाट्यसंस्थेला, कोणत्याही रंगकर्मीला, कुठल्याही वेळी उपयोगी पडेल असे तरीही सर्वसामान्य वाचकाला आवडेल असे रंजक असे काही...
Adv.Jitesh Potdar
14/06/2019

Very Nice
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat