Summary of the Book
'पुस्तक, पेन, कप अशा सध्या गोष्टींपासून ज्यांना वंचित राहावं लागतं, तुरुंगातल्या वितभर जागेत ज्यांना आयुष्य कंठावं लागतं, इतर लोकांशी दोन वाक्य तरी बोलायला मिळावीत या प्रतीक्षेत ज्यांना महिनोनमहिने निष्ठत राहावं लागतं, अशा कैद्यांच्या गजाआडच्या जीवनावर प्रकाश टाकणारं आवर्जून वाचायलाच हवं असं हे पुस्तक !'
तुरुंग म्हणजे सर्वांना समान पातळीवर आणणारी जागा असं जरी म्हंटलं जात असलं तरी जेव्हा भारतातल्या एखद्या तुरुंगात एखादी 'व्ही . आय. पी.' व्यक्ती कैदी म्हणून येते, तेव्हा हे कितपत खरं ठरतं ? कधी विचार केला आहे का ? तुम्ही हजारभर रुपये चोरटा आणि हवालदार तुम्हाला मारून ठोकून गर्भगळीत करतो. प्रकाशाची तिरीप किंवा हवेचा किंचितसा झोतदेखील येणार नाही, अशा काळ्याकभिन्न कोठडीत तुम्हाला डांबतो: पण जेव्हा तुम्ही पंचावन्न हजार करोडो रुपये चोरता, तेव्हा मात्र गजाआड तुमची बडदास्त राखली जाते. सर्वसोयीनीयुक्त अशा चाळीस फ़ुटी ऐसपैस कोठडीत तुमची तत्परतेनं सोय केली जाते. आतमध्ये चार एअरकंडिशर्न्स, इंटरनेट, फॅक्स, मोबाईल फोन अशा सुविधा तुम्हाला मिळतात.... तुमचे जोडे पुसण्यापासून तुम्हाला उत्तम भोजन पुरवण्यापर्यंत (क्वचितच 'ह्यात हॉटेले 'ऐवजी दुसरीकडून तुमचं जेवण येत). तुमचा शब्द झेलायला किमान दहा जण तत्पर असतात.