Summary of the Book
एक प्रयोगशील नाटककार जेव्हा लोकप्रिय, धंदेवाईक नाटकाची शैली उचलून आपलं नाटक रचतो तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असतो. जगभर पोस्ट मोर्डनिस्ट कलावंतांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी पॉप आर्ट्सचा आसरा घेतला आहे. या नाटकाच्या मांडणीसाठी शफाअत खान साठच्या दशकातील मेलोड्रॅमॅटिक नाटकाच्या शैलीचा आणि आकृती बंधाचा वापर करतात.
आजच्या परिस्थितीवर तिरकस भाष्य करणारं हे नाटक उपरोध, उपहास आणि अतिशोयोक्ती या विनोदास्त्रांचा वापर करत लीलया रचलं आहे. नाटकाची रचना कानेटकरी असली तरी त्याची हाताळणी मात्र खास शफाअत खानी आहे....... अस्वल जसं गुदगुल्या करत मारतं तसं हे नाटक हसवता, हसवता प्रेक्षकांचं वस्त्रहरण करतं. वरपांगी थिल्लर वाटणार विनोद प्रत्यक्षात अत्यंत धारदार जखमा करतात.