Summary of the Book
गंगेच्या अंगाखांद्यावर खेळता खेळता मोठे होणारे आम्ही गंगेकाठाचे वाळवंट विसरूशकत नाही.आजच्या शब्दांत बोलायचे तर गंगाकाठ व वाळवंट ही पैठणच्या सांस्कृतिक जीवनाचे एक व्यासपीठ म्हणायला हरकत नाही. उन्हाळ्यातल्या ठळक घटनांमध्ये नाथषष्ठीचा उत्सव! एप्रिलमध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षा, त्यांचे निकाल अन् निकालानंतर पास झाल्यावर सुसाट वेगानं येऊन गंगेत डुंबणारेआम्ही असे हे वेळापत्रक असायचे .एकनाथषष्टीचा हा उत्सव ही गावातली 'बिग्गेस्ट इव्हेंट' एकनाथांनी तर पंढरपूर ,विठोबा ,रखुमाई ,चंद्रभागा ,पुंडलिक यांच्यावर त्यांचे किती प्रेम होते हे दाखविणारा अभंगच केलाय 'माझे माहेर पंढरी '.त्यामध्ये त्यांच्या सगळ्या भावना आलेल्या आहेत.या गोदेचे पाणी प्यालेल्या नाथांना चंद्रभागा ही बहिणीसारखी वाटली!