Summary of the Book
पुरुषांच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये धडाडीने काम करणाऱ्या महिलांकडे नेहमी कुतूहलाने पाहिलं जातं. साहस हे असं क्षेत्र. ते पुरुषांचं समजलं जात असलं, तरी महिलांनी युगानुयुगे दाखविलेल्या धाडसाच्या गाथा आपल्याला माहिती आहेत. मिलिंद आमडेकर यांनी आजच्या काळातील साहसी महिलांच्या अद्भूत गाथा वाचकांसमोर आणल्या आहेत. पश्चिम ओस्ट्रेलियाचं तीन हजार की. मी. चं वाळवंट ओलांडणारी रॉबिन डेव्हिडसन, उत्तर ध्रुवाकडील सफर एकटीनं करणारी हेलन थायर, खडतर शर्यतीत हॅट्रीक साधणारी सुसान बुचर, कांचनगंगावर जाणारी पहिला महिला जिनेट हॅरिसन अशा कितीतरी जागी या पुस्तकात आपल्याला प्रेरणा देतात.