Summary of the Book
विज्ञान - शतपत्रांचे लेखन हे मुलांसाठी हेतूपूर्वक केले आहे. जगातील सारे जीवन हे विज्ञानाने व्यापले आहे. मुलांना घर, घरातील नानाविध वस्तू, बाह्य परिसर, बाग, पशुपक्षी, जेवण, जेवणाचे पदार्थ, घरात उपद्रव देणारे डास, ढेकूण, माश्या, पाली यासारखे कीटक, निसर्गातील दृश्ये, तांबडे निळे आकाश, ऊन, वारा, पाऊस त्यांच्या अनुभवास येणारे प्रसंग, आकाशातील तारे, चंद्रग्रहण, सुर्यग्रहण, ग्रहगोल, धूमकेतू, उल्कापात, अशा नानाविध गोष्टीबद्दल विलक्षण कुतूहल असते.