Summary of the Book
मराठी कवितेचा अभ्यास आतापर्यंत अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केला आहे व मराठी काव्यातल्या त्यांच्या दृष्टीने असणार्या चांगल्या-वाईट प्रवृत्तींचा आढावा वेळोवेळी घेतलेला आहे. मराठी भावकवितेकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोण कै. वसंतराव कानेटकरांनी या पुस्तकाच्या रूपाने दिला आहे. अभ्यासाची एक वेगळीच वाट त्यांनी अभ्यासकांना दाखविली आहे...
सनसनाटी विधाने करून प्रसिद्धी मिळविण्याचे तंत्र कानेटकरांना आपल्या आयुष्यात कधीच वापरण्याची गरज पडली नाही. या पुस्तकातील विवेचनातही त्यांनी कसल्याही धक्का तंत्राचा अवलंब केलेला नाही. ज्या तडफदारपणे त्यांनी आपल्या दृष्टिकोणाचे विवेचन आणि समर्थन केले आहे व त्यासाठी मराठी कवितेच्या वाटचालीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांचे जे दिग्दर्शन अतिशय साक्षेपाने केले आहे त्याचा एका रसिकाच्या आणि विचारवंताच्या दृष्टिकोनातून आस्वाद घ्यायला काहीच हरकत नसावी.
- प्रस्तावनेतून