Hard Copy Price:
25% OFF R 495R 371
/
$
7.20
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
"स्त्रीला दैनंदिन जीवनात किती प्रकारच्या निरनिराळ्या मागण्या, पर्याय, निर्णय व कामांची सांगड घालायची असते... हे काम किती खडतर असतं ते मला माहीत आहे. आम्हा बायकांपैकी बर्याच जणी स्वत: घेतलेल्या निर्णयांबाबत विचारल्या जाणार्या, ओरखडे उठवणार्या प्रश्नांना तोंड देत व अपराधीपणाचं ओझं वागवत जगत असतात... मग आमचा निर्णय काही का असेना. माझ्या स्वत:च्या आयुष्यात मी पत्नी, माता, मुलगी, बहीण, सून, विद्यार्थिनी, वकील, बालक-हक्कांसाठी काम करणारी, विधी शाखेची प्रोफेसर, मेथडिस्ट, राजकीय सल्लागार, नागरिक... आणखीही बरीच काही होते. आता मात्र मी 'प्रथम महिला' म्हणजे एक 'प्रतीक' होते आणि हा अनुभव नवा होता."
'लिव्हिंग हिस्ट्री'मध्ये मुख्यत्वे हिलरी रॉडहॅम-क्लिन्टन यांच्या व्हाईट हाऊसमधल्या आठ वर्षांच्या कालखंडातील स्मृतींचा समावेश आहे. परंतु या स्मृतींचा समावेश आहे. परंतु या स्मृतींचे बंध त्यांच्या जन्मापासून किंवा त्याआधीच्या काळापर्यंत गुंफलेले असल्यामुळं या पुस्तकात त्याही स्मृती जागल्या आहेत. देशातील कायदेविषयक बाबींत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या हिलरी क्लिन्टन २००० साली न्यूयॉर्कमधून अमेरिकी सिनेटवर निवडून गेल्या. 'प्रथम महिला' या पदाची नवी व्याख्या बनवणार्या हिलरींनी हे लेखन अतिशय उत्कटपणे केले आहे. खंबीर पत्नी, प्रेमळ माता या त्यांच्या रूपांबरोबरच त्यांच्या सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक निष्ठा; मानवाधिकार, महिला-बालहक्क यांसह जागतिक समस्यांविषयीची आस्था या पुस्तकातून प्रकट होते आणि प्रत्येक पावलावर शिणवून टाकणार्या आव्हानांना समर्थपणे तोंड देणार्या, स्वत:चा 'आवाज' शोधून स्वत:ची निराळी ओळख बनवणार्या, आंतरराष्ट्रीय पटावर व अमेरिकी राजकारणात जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्या या प्रगल्भ व कणखर स्त्रीच्या जीवन-प्रवासाचे दर्शन घडते.