Summary of the Book
डॉ. आशिष रॉय यांनी वयाच्या 78 वर्षी शंभरावी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. असा पराक्रम करणारे ते एकमेव भारतीय व्यक्ती आहेत. हवाईदलातील निवृत्तीनंतर क्रीडाप्रकारात रस घेऊन मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभागी होणे ही साधी बाब नाही. या खेळाचा लाखो लोक आनंद घेत असतात. म्हणूनच डॉक्टरांनी या पुस्तकाचे नावच "जॉय ऑफ रनिंग' असे ठेवले आहे. डॉक्टरांच्या या आत्मवृत्ताचा अनुवाद श्रीकांत जोशी आणि विनीता जोशी यांनी केला आहे.