Summary of the Book
मुलांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांकडून होणारं त्यांचं संगोपन आणि त्यांना मिळणारं शिक्षण महत्त्वाचं असतं. या दोन गोष्टींच्या आधारेच त्यांच्या विकासाचा पाया रचला जातो. मुलांना योग्य शिक्षण मिळालं आणि पालकांकडून त्यांचं संगोपनही योग्यरीत्या झालं, तरच मुले पुढील आयुष्यात यशस्वी घोडदौड करू शकतात.
मुलांच्या उत्तम संगोपनासाठी तुम्ही ‘आदर्श पालक’ आहात का? असा प्रश्न विचारून डॉ. उमेश शर्मा यांच्या ‘बॉर्न टू ग्रो’चा अनुवाद असणा-या ‘सुजाण संगोपन’ या पुस्तकाद्वारे उत्तम पालक बनण्यासाठी काय आवश्यक असतं, याचे धडे लेखकाने दिले आहेत.