Home
>
Books
>
कॉम्प्युटर, माहितीपर
>
Yanni Jag Badalal Google Katha Mahitichya Ajastra Karkhanyachi - यांनी जग बदललं गुगल कथा माहितीच्या अजस्त्र कारखान्याची
Hard Copy Price:
25% OFF R 99R 74
/ $
0.95
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
‘गुगल : कथा माहितीच्या अजस्र कारखान्याची’ या पुस्तकात गुगलच्या प्रवासाचा आलेख रेखाटण्यात आलेला आहे. माहिती शोधणं या गोष्टीला आधार मानून त्यावर एक कंपनी उभी करणं आणि ती जगातल्या सगळ्यात मोठय़ा कंपन्यांपैकी एक अग्रेसर कंपनी बनणं, यामागची भन्नाट सत्यकथा या पुस्तकात उलगडून दाखविली आहे. या सनसनाटी प्रवासाची रंजक सफर वाचकाला या पुस्तकात घडते.
गुगलचे निर्माते कोण, या कंपनीला पैसे कुठून मिळतात, गुगल हे सर्वोत्तम सर्च इंजिन का मानले जाते, जी-मेल, यू-टय़ूब, अँड्रॉईड कुठून आलं, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. गुगल ही एकच कंपनी इतकं सगळं अफाट काम कसं काय करू शकते, हे अनेकांना पडलेलं कोडं आहे. माहितीच्या या प्रचंड साठय़ाबद्दलही आपल्या मनात अपार औत्सुक्य असतं. यानिमित्ताने उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ांचा आणि प्रश्नांचा परामर्श यात घेण्यात आलेला आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच गुगलचे जनक पेज आणि ब्रिन यांच्याबद्दल लिहिले आहे. सर्च इंजिनची कल्पना, गुगलचा जन्म, गुगलचं अर्थकारण, अॅडसेन्स आणि अॅनॅलिटिक्स या तंत्रज्ञानाची क्रांती, जी-मेल, शेअरबाजारात घेतलेली झेप, गुगल डॉक्स आणि क्रोम, अँड्रॉईडद्वारे मोबाइल फोन्सच्या जगात प्रवेश, यू-टय़ूब हे व्हिडीओचं जग, गुगल बुक्स अशा विविध अंगांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.