Summary of the Book
आपल्याभोवती अनेक घटना घडत असतात. त्या पाहून, वाचून आपल्याला अनेकदा त्यातील दांभिकपणा, खोटेपणा, विसंगती दिसते. सामाजिक जीवनातील अशा विसंगतीवर ह. मो. मराठे यांनी 'मुंबईचे उंदीर'मधून व्यंगकथा लिहिल्या आहेत. देवदर्शनाला नटनट्या आल्या की त्या देवस्थानचे, मंदिराचे, भटजीमंडळींचे पर्यायाने देवतेचे भाग्य खुलते. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम, एखाद्या गंभीर घटनेबाबत दिसणारी सरकारी अनास्था, प्राथमिक शिक्षण आदी अनेक विषयांवरील या कथा वाचकांना हसवितात आणि अंतर्मुखही करतात.