Hard Copy Price:
24% OFF R 90R 68
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
लहान मुलांना खेळणी ही मुळातच आवडत असतात. लहान मूल जेव्हापासून खेळू, बागडू लागते, तेव्हापासूनच त्याच्या अवतीभोवती दिसणार्या असंख्य चल, अचल अशा वस्तू त्याला दिसतात व निसर्गत:च त्याच्या मनामध्ये त्या वस्तूंबद्दल कुतूहल निर्माण होते. घरामध्ये दिसणार्या पाळीव प्राण्यांकडे - कुत्रा, मांजर, पोपट, इ. पाहून तो त्याच्या परीने त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतो. बागेमध्ये फुलपाखरू दिसल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. लहान मूल अनुकरणशील असल्यामुळे ते त्याला जी सजीव, निर्जीव वस्तू दिसेल, ती कार्य'कसे करते. ह्याविषयी त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते व ते त्याबद्दल विचार करण्यास शिकते. ही निरीक्षण-शक्ती हाच विज्ञानाचा पाया आहे. श्री. इटोकर ह्यांना मी गेल्या वीस-बावीस वर्षांपासून ओळखतो. ते चित्रकला शिक्षक आहेत. कागदावर वेगवेगळ्या कलाकृती रंगवतात, असे नव्हे, तर निरनिराळ्या वस्तूंपासून चित्रशिल्पाची निर्मितीही करतात. या चित्रशिल्पांनाच त्यांनी विज्ञानाची जोड दिलेली आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी विज्ञानाच्या तत्त्वावर आधारित चित्रशिल्पे कशी करावीत, हे आकृतींसह स्पष्ट केले आहे. ही चित्रशिल्पे साध्या साध्या घरगुती वस्तूंतून तयार केली जाऊ शकतात व लहान मुलांना सहज करता येतील. हे पुस्तक शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांच्या संग्रही आवश्यक करावे. पालकांनीही हे पुस्तक संग्रही ठेवून आपल्या लहान मुलांना ह्या कृती करण्यास साहित्य पुरवून, लहान मुलांची विज्ञानाची निरीक्षण व आकलन-शक्ती सहजपणे वाढविण्यास मदत करावी. श्री. इटोकरांनी ह्यापूर्वीही "प्राथमिक शाळांमध्ये चित्रकला अध्यापन गतिमान कसे करावे?" हा निबंध लिहून महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. हा 'विज्ञान खेळण्यांचा’ उपक्रम निश्चितच कौतुकास पात्र आहे.