Summary of the Book
आहारशास्त्राच्या अभ्यासक आणि काही वर्षांपासून आहारशास्त्रावर सातत्याने लेखन करणाऱ्या डॉ. मालती कारवारकर यांनी केलेले हे लेखन आहे. अलीकडच्या काळात सुदृढतेपेक्षा बारीक असण्यावर भर दिला जिम, कॉस्मेटिक सर्जरी किंवा अत्यंत कमी खाण्याकडे कल दिसतो; परंतु बारीक असण्यापेक्षा सुदृढ, निरोगी असणे महत्वाचे असते.
असे शरीर आपल्याला आहारातूनच मिळू शकते, असे डॉ. कारवारकर सांगतात. त्यासाठी आहारात बदल कसे करायचे, मेन्यू प्लानिंग, बाहेरचं खाताना, सकाळच्या न्याहारीतील कुपोषण, कॅलरी, प्रोटीन आदींविषयी त्या पुस्तकातून मार्गदर्शन करतात. ताण-तणाव, जीवनशैली, लठ्ठपणा आदींविषयी त्या भाष्य करतात.