Shubham Chavan
11 Jul 2019 05 30 AM
चांदनचुरा 🌌
एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये कवयित्री दाखवलेल्या स्पृहा जोशी आपल्या जीवनात खरोखरच कवयित्री आहेत. एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून आपण स्पृहा जोशी यांना ओळखतो. पण त्या एक संवेदनशील कवयित्री सुद्धा आहेत हे आपल्याला त्यांच्या कविता वाचताना लक्षात येतं. मला कालच त्यांचा ' चांदनचुरा ' हा कवितासंग्रह मिळाला आणि मी लगेच अर्ध्यातासातच तो एका दमात वाचून टाकला. या कविता वाचल्यावर मला समजलं की मी सुद्धा अगदी अशाच कविता करायचो.
● पुस्तकाविषयी :-
चांदनचुरा हा स्पृहा जोशी यांचा पहिला कवितासंग्रह आहे. त्यांनी शालेय जीवनात लिहलेल्या कवितांचा हा संग्रह. ' चांदनचुरा ' वाचताना त्यांच्या कविता आणि कविमन कसं बहरत गेलं हे आपल्या लक्षात येतं. संवेदनशील, भावविभोर, तटस्थ, चिंतनशील, प्रेमकविता अशा साऱ्या प्रकारच्या कविता त्यांनी लिहील्या आहेत. हा कवितासंग्रह म्हणजे कवयित्रीच्या मनाच्या आकाशातील कल्पनांचा, शब्दांचा पांढराशुभ्र चांदणचुरा आहे. यातील कवितांमध्ये वास्तवाचे भान आहे. तसंच या कवितांमध्ये सामाजिक विषयांचीही जाण असल्याचे आढळते. या काव्यसंग्रहात ४६ कविता आहेत. प्रत्येक कव