Summary of the Book
जीवनामध्ये ध्येय गाठायचे असेल, तर त्यासाठी कठोर परिश्रम करणे ओघानेच येते; पण नोकरी- व्यवसायाव्यतिरिक्त अभिनयासारख्या बिनभरवशाच्या क्षेत्रात पाय रोवून उभे राहणे कठीण गोष्ट आहे. यासाठी 'स्ट्रगल' हा करावाच लागतो, असे म्हंटले जाते. मराठी चित्रपट, रंगभूमीवर काम करणाऱ्या २० प्रथितयश अभिनेते- अभिनेत्रींचा 'स्ट्रगल' आशिष निनगुरकर यांनी 'स्ट्रगलर'मधून मांडले आहे.
'दिसायला खराब असल्यामुळे तू अभिनेता होऊ शकत नाहीस,' असे सांगून नाउमेद करणारे अनेकजण भेटले, तरी न हरता सिद्धार्थ जाधव उर्फ सिद्धूने आपले स्थान निर्माण केले. अशा प्रकारचे काही प्रसंग पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी, शरद पोंक्षे, नंदू माधव, अमृता खानविलकर यांनी अनुभवले.
वेगवेगळ्या पातळीवर स्ट्रगल करावा लागलेल्या कलावंतांचा जीवन प्रवास यात आहे.
सुनील बर्वे, संदीप कुलकर्णी, संतोष जुवेकर, श्रेयस तळपदे, मिलिंद शिंदे, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, संदीप पाठक, शिल्पा तुळसकर, क्रांती
रेडकर, तेजस्विनी पंडित, मुक्ता बर्वे, अमृता सुभाष, भार्गवी चिरमुले, समीर दीक्षित आदींनी अभिनय क्षेत्रातील आपले अनुभव सांगितले आहेत.