Summary of the Book
योग्य निरामय जीवनशैली अंगीकारून सुखी,आरोग्यपूर्ण जीवन कसे जगता येते व आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतींचा वापर करून निरोगी शरीर कसे ठेवता येते हे श. प. पटवर्धन यांनी 'शून्योपचार (भाग दहावा)' मधून सांगितले आहे. या पुस्तकात निसर्गातील ४८ वनस्पतींचा आरोग्यासाठी कसा उपयोग करायचा यावर मार्गदर्शन केले आहे.
वनस्पतीचे मूळ, मुळाची साल, खोड फळ, फळाची साल, फुले, पाने, कळ्या, बिया, बियांमधील मगज, बियांची साल, डिंक, अशा अनेक अंगांच्या उपयोगाची माहिती दिली आहे. वजन कमी करण्यासाठीच्या वनस्पती, वजन वाढविण्यसाठी, खजूर, बटाटा, सीताफळ, पचन सुधारण्यासाठी काकडी खावी, जेवणानंतर वेलचीचे दाणे चघळावेत. मधुमेह टाळण्यासाठी कारले, कुळीथ, लाल कोबीचा वापर करावा हे सांगितले आहे.
अननस, अशोक, आळशी, कढीलिंब, गवार, गहू, घेवडा, चिकू, जायफळ, पडवळ, पातीचहा, पानफुटी, पिंपळ, पेरू, ब्राह्मी, माठ, वड, वेखंड, हिंग, अशा वनस्पतींची ओळख, गुणधर्म, त्यातील पौष्टिक घटक, वापरण्याची पद्धत, आरोग्यासाठी उपयोग यात दिले आहेत. लेखकाने यासंदर्भात केलेल्या सूचनांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.