Summary of the Book
शेकडो रक्ताच्या चाचण्या, महागडी टॉनिक आणि मेडिक्लेमचे हफ्ते भरणे म्हणजेच आरोग्य नव्हे. आपल्या शरीर अवयवांची माहिती समजून आहार विहारात योग्य बदल केल्यास अनेक आजारांपासून आपण लांब राहू. रोग होऊ नयेत म्हणून काय करावं आणि समजा झाले तरी ते आटोक्यात ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये काय काय बदल करावेत हे खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलंय. बसल्या बैठकीत वाचून होणारं हे पुस्तक खरं म्हणजे एक उत्तम इंस्ट्रक्शन मॅनुअल आहे. व्याधी होऊ नये म्हणून ह्या पुस्तकात सुचवलेले उपाय हे सहज करता येण्यासारखे आहेत.