Milind Kolatkar
10 Nov 2012 05 30 AM
"दिवस असे की..." सलग असे झपाटल्या सारखे वाचले. खुप बरे वाटले. एका वेगळ्या वाटेवरचे अनुभव वाचल्याचे समाधान मिळाले. विशेषत: वर्तमानपत्र विश्वाची उत्तम ओळख झाली. हातात - आणि आता नेटवर - येणाऱ्या रोजच्या 'पेपर' मागे किती जणांचे केवढे कष्ट असतात हे
नव्याने जाणवले. - प्रामुख्याने उत्तरार्धातील भागात.
(शनिवारी इकडे "बंद" होता. सत्कारणी लागला.)
प्रवीण बर्दापूरकर यांची भाषा ओघवती आहे. लिखाण भुरळ घालते. ते सतत पुढे वाचत रहावेसे वाटते. "डायरी"त त्याची जाणीव झाली होतीच.
लोकसत्ताच्या संपादकांविषयी - सारेच - एक उत्सुकता होती. "दिवस..." ने काहीप्रमाणात तीही शमली.