Summary of the Book
पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून एखादे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी झालेल्यांपैकी रामदास भटकळ एक आहेत. ग्रंथव्यवसायात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. रिंगणात काम करतानाच त्यांनी राजकारण, रंगभूमी, संगीत या क्षेत्रांचाही संचार केला. या कलांचा आस्वाद त्यांनी रिंगणाबाहेरून घेतला. त्यातून मिळालेला आनंद त्यांनी 'रिंगणाबाहेरून' मधून वाचकांमध्ये वाटला आहे. इंदिरा गांधी व त्यांचे राजकारण, रंगभूमीवरील उत्तुंग व्यक्तिमत्व, संगीतातील फय्याज खाँ व अन्य संबंधित व्यक्तींविषयी अनुभव यात आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या जीवनात केलेल्या मुशाफिरीचे अनुभव वेगळे आहेत.