Summary of the Book
संगणकावरील 'इलस्ट्रेटर सीएस-५' ही प्रणाली आर्टीस्टमध्ये खूप लोकप्रिय आहे. ग्राफिक, फॅशन डिझायनिंग, आयटी क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याची माहिती मराठीत देऊन याचा वापर कसा करायचा हे नरेंद्र आठवले व सुजाता आठवले यांनी 'इलस्ट्रेटर सीएस-५' मधून सांगितले आहे. प्राथमिक माहितीत नवीन डॉक्युमेंट तयार करणे, मेनू बार, टूल पॅनल, गाइडलाइन, स्मार्ट गाइड, ग्रीड याची माहिती दिली आहे.
डॉक्युमेंट सेटअप, आर्टाबोर्ड आणि झुमिंग, सिलेक्शन टूल्स, बेसिक शेप टूल्स, टाइप टूल्स, कलर थेअरी, फिल, आणि स्ट्रोकचा वापर, पेंटिंग टूल्स, रिशेपिंग टूल्स, सिम्बॉल टूल्स, ग्राफ आणि चार्ट तयार करणे, ग्राफिक स्टाइल. इफेक्ट आणि थ्रीडी या आर्टीस्टला आवश्यक ठरणाऱ्या सर्व गोष्टी कशा करायच्या हे आकृत्या, विविध उदाहरणांसह सांगितले आहे.