पातंजल योगसूत्रे म्हणजेच अष्टांग योग. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही महत्त्वाची आठ अंग आहेत. त्यांची सत्य, अहिंसा, अस्तेय अशी बरीच उपांग आहेत. या सर्वांचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी 'नाथ अष्टांगयोग'मधून केले आहे. पातंजल योगसूत्रांचा भावार्थ खुप वेगळ्या पद्धतीने यात मांडला आहे. अष्टांग योग म्हणजे काय हे सांगून आत्मज्ञानप्राप्तीसाठी नेमके काय केले पाहिजे हे थोडक्यात पण सोप्या भाषेत केले आहे. अष्टांगाशी संबंधित अनेक संकल्पना लेखिकेने उलगडून दाखविल्या आहेत. योग्याने संसारात राहून समतोल जीवन कसे जगावे , मनावर ताबा मिळवून मनाला परमशक्तीशी जोडून भौतिक आणि अध्यात्मिक जीवन संतुलित वृत्तीने कसे जगावे याचे मार्गदर्शन केले आहे. चित्तावरील विकारांचे पटल दूर झाले की आत्मज्ञान प्रकटत हा संदेश दिला आहे. एकूण ३४ छोट्या सुत्रांमधील खोल अर्थ यात समजावून दिला आहे.
‘नाथ- अष्टांगयोग’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5511493589803541692