Summary of the Book
ब्रेल लिपीतील भारतातील पहिली ज्ञानेश्वरी लिहिणारे ह.भ.प. गणपत महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे पुस्तक. लहानपणी आलेले अंधत्व, गरिबीमुळे शिक्षणही झाले नाही. ज्ञान मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट करीत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम महाराजांनी केले. ब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ तयार करुन अंधांना ज्ञानचक्षू दिले. गणपत महाराजांचे चरित्र निश्चितच मार्गदर्शक आहे. लेखिकेने अत्यंत सोप्या भाषेत महाराजांचे चरित्र मांडले आहे.