Summary of the Book
पंढरीच्या लागा वाटे | सखा भेटे पांडुरंग || 'संतांचा अभंगप्रवास आपण जण प्रत्यक्ष अनुभवला, तर प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन निश्चित होईल, ' असा संदेश देविदास पोटे यांनी या पुस्तकातून दिला आहे; मात्र केवळ हा संदेश देऊन ते थांबत नाहीत, तर या प्रवासात ते स्वतः वाचकांना मार्गदर्शन करतात.
संतांनी लिहिलेल्या हजारो अभंगांमधून काही निवडक अभंग निवडून त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. जय जय राम कृष्ण हरी, आवडीने भावें हरीनाम घेशी, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, निरंजनी आम्ही बांधियेलें घर,
नामाची आवडी जिव्हेसी तो चाळा, जन्मोजन्मीं आम्ही बहु पुण्य केले, मुंगी उडाली आकाशी, सुख पाहता जवापाडें अशा रसाळ, अर्थवाही अभंगांचा अर्थ त्यावरील भाष्यासह वाचणे हा आनंददायी अनुभव ठरावा.