Summary of the Book
आजच्या विद्यार्थ्यांना समोर दिसत आहेत करिअरच्या अनेक उत्तम संधी, आणि त्याचसोबत दिसत आहेत अनेक कठीण आव्हाने. अशा या आजच्या परिस्थितीत यशाची गुरुकिल्ली आहे, ‘टाईम मॅनेजमेंट’. ज्यांना वेळेचे नियोजन करायला जमेल त्यांनाच यापुढे यश मिळेल. ज्यांना जमणार नाही, त्यांच्या निराशा पदरी पडेल.
‘टाईम मॅनेजमेंट’ म्हणजे सतत कामात बुडून जाणे आहे का? ‘वर्कोहोलिक’ होणे आहे का? नाही! ‘टाईम मॅनेजमेंट’चा अर्थ हा आहे की, कोणताही ताण न घेता, अत्यंत कार्यक्षमतेने आपली सारी कामे नीट पूर्ण करणे; आणि आयुष्यात मजेच्या आणि आनंदाच्या गोष्टींसाठी जास्त वेळ मिळवणे.
हे पुस्तक म्हणजे एक ‘कार्य-पुस्तक’ आहे, ‘वर्क-बुक’ आहे. म्हणजेच हे आचरणात आणण्याचे पुस्तक आहे. इथे टाईम मॅनेजमेंटसाठीची सोपी आणि प्रभावी अशी अनेक तंत्रे विषद केली आहेत. त्यासाठी उपयोगी पडणाऱ्या ‘टिप्स’ दिल्या आहेत. यात चर्चा केलेली आहे, ‘अभ्यासाची प्रभावी पद्धत’, ‘स्मरणशक्ती कशी वाढवावी’, ‘जलद गतीने वाचन’, ‘वर्गात नोट्स कशा काढाव्यात’, ‘परीक्षेच्या काळातील टाईम मॅनेजमेंट’ या, आणि अशाच काही अन्य विषयांची.
पण एक ‘वर्क-बुक’ आहे, त्याचबरोबर हे एक प्रेरणा देणारे पुस्तकपण आहे. इथल्या सर्व लिखाणाचा संदर्भ केवळ विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्यांच्या परीक्षा एवढ्यापुरता मर्यादित नाही. तर यातील विवेचन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे भावी आयुष्य समृद्ध करायलादेखील उपयोगी पडेल.
विविध पातळीवरच्या, आणि शिकण्याच्या वेग-वेगळ्या क्षमता असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा, परीक्षेसाठी तयार करण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अतिशय प्रदीर्घ असा अनुभव लेखकाला लाभलेला आहे. या साऱ्या अनुभवांमधून ‘टाईम मॅनेजमेंट आणि विद्यार्थी’ या विषयाबाबत त्याला एक दृष्टी लाभली. त्यासंबंधी एक वेगळी जाण आली. त्याचे प्रतिबिंब प्रवाही भाषेत लिहिलेल्या आणि अत्यंत वाचनीय असलेल्या अशा या पुस्तकामध्ये सतत दिसत रहाते.
प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे पुस्तक असले पाहिजे, आणि त्याने ते वारंवार वाचले पाहिजे, ज्यामुळे त्याचा फायदा होईल- आत्ताच्या विद्यार्थी जीवनात, आणि नंतरच्याही आयुष्यात.