Summary of the Book
नवी पिढी ही स्वतंत्र विचाराची आहे. स्पर्धेच्या युगात त्यांच्या गरजा बदलल्या आहेत. शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक याविषयीच्या भावना वेगळ्या आहेत. आपल्या आवडत्या माणसांवर प्रेम करणे आणि काही दिवसांनी ती आवडेनाशी झाली की त्यांच्यापासून दूर होणे, हे तरुणांमध्ये सातत्याने घडत असल्याचे दिसून येते.
अशा काळात त्यांच्या मनातील भावना सुदीप नगरकर यांनी ‘फ्यू थिंग लेफ्ट अनसेड’मधून व्यक्त केल्या आहेत. आदित्य आणि रिया यांची ही प्रेमकथा आहे. तसेच प्रेमभंगाचीही कहाणी आहे. प्रेम करताना एकमेकांना समजून घेण्याची, मन जाणून घेण्याची आवश्यकता असते. त्याची कमतरता व त्यातून दोघांची मनःस्थिती या कथेतून दिसते. याचा मराठी अनुवाद सुहासिनी देशपांडे यांनी केला आहे.