स्वतःला अविस्मरणीय बनवा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
प्रत्येकाच्या तुम्ही स्मरणात राहाल आणि कुणीही तुम्हाला विरोध करणार नाही अशा व्यक्ती तुम्ही कसे बनाल.
      'मेक युवरसेल्फ अनफरगेटेबल' हे पुस्तक अविस्मरणीय बनण्याविषयीच्या दहा आवश्यक घटकांचा सखोल अभ्यास करते आणि वाचकांना ते घटक आत्मसात करून टप्प्याटप्प्यांनी आत्मविकास कसा करायचा या विषयीचे मार्गदर्शन करते. 'दर्जेदार' असणे म्हणजे नेमके काय ? लोकांच्या प्रचंड भाऊगर्दीमध्ये स्वतःला तुम्ही वेगळे कसे दर्शवाल आणि यशस्वी नेता कसे व्हाल ? तुमची अंत:प्रेरणा तुमच्या व्यावसायिक निर्णयांवर केव्हा प्रभाव पाडेल आणि कधी तुम्हाला मार्गदर्शन करेल ? तुमच्या या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या प्रेरणादायी आणि सर्वस्पर्शी पुस्तकामधून चुटकीसरशी मिळतील.
    वाचक डेल कार्नेगी यांच्या 'दर्जेदार कृती' च्या संकल्पनेमागील गुपिते जाणून घेतील. त्याचबरोबर संवाद साधण्याच्या मार्गात येणाऱ्या समस्यांवर मात करणाऱ्या सहा पायऱ्या, नैतिक मूल्ये जपताना येणाऱ्या चार अनपेक्षित समस्या आणि त्याचे निवारण शिवाय आत्मविश्वास, आधुनिक तंत्रे आणि लवचीकपणा अंगी बाणवत भीतीवर मात करण्याचे तंत्र आणि सामाजिक कौशल्ये आत्मसात करण्याच्या पाच क्लृप्त्या असे सगळे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या कृती 'दर्जेदार' याच शब्दात ओळखल्या जाणार आहेत.
    जागतिक पातळीवरील खरीखुरी उदाहरणे आणि व्यावहारिक सूचनाही या पुस्तकाला मार्गदर्शनपर परिपूर्ण पुस्तक म्हणून अविस्मरणीय करणार आहेत. ज्या व्यक्तींना आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावशाली बनवायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अनन्यसाधारण आहे.
    डेल कार्नेगी यांनी 'हाऊ टू विन फ्रेन्डस अॅन्ड इन्फ्लुएन्स पिपल' हे पुस्तक १९३६ साली लिहिले, जे संपूर्ण जगात मैलाचा दगड म्हणून समजले जाते आणि संपूर्ण जगभर त्यातील तत्त्वे आचरणात आणली जातात. त्यांनी 'डेल कार्नेगी ट्रेनिंग' ही कंपनी इ.स. १९१२ मध्ये स्थापन केली. ही कंपनी आज ८० पेक्षा अधिक देशांमध्ये हे ट्रेनिंग प्रोग्रॅम राबवते आहे.       ---
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat