Summary of the Book
मानवी जीवनातील अनेक गरजांपैकी कामप्रेरणा ही एक निसर्गक्रिया असते. त्यात अपराधीपणाची भावना नसत, असे बेटी डॉडसन यांनी म्हटले आहे. विख्यात मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांच्या पुस्तकांमध्येही त्यांचा संदर्भ आहे., असे सांगून अंजली जोशी या मानवशास्त्रज्ञ असलेल्या लेखिकेने 'विरंगी मी! विमुक्त मी! या कादंबरीतून डॉडसन यांचे चरित्र, त्यांच्या कार्याची माहिती वाचकांपर्यंत पोचवली आहे.
'अपराधमुक्त हस्तमैथुन' ही संकल्पना बेटी यांनी मांडली आणि त्याविषयी समाजात, महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लढा सुरु केला. लैंगिक मुक्ती हा स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे, या धाडसी विधानावर त्या ठाम राहिल्या. तो कालावधी १९४२च्या नंतरचा होता. डॉडसन यांच्या मोहिमेला अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशातही त्यावेळी विरोध झाला.
त्या चित्रकार असल्याने त्यांनी स्वतःच्या कामक्रीडेतील चित्रांचे प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये भरविले आणि प्रचंड रोषाला त्यांना सामोरे जावे लागले; पण ध्येयापासून डॉडसन विचलित झाल्या नाहीत. या कथेतून असाधारण धैर्य, भीती, संकोच यांच्या पलीकडील त्यांच्या व्याक्तीमात्वाचे पैलू उलगडतात.
कादंबरीचे कथानक, वर्णन, पात्रे, व्यक्तीचित्राने कल्पनेच्या आधारावर असली तरी यातून बेटी डॉडसन यांचे विचारीक अधिष्ठान समजते.