Summary of the Book
राजकारण, समाजकारण, अभिनय व अन्य क्षेत्रांत आपल्या देशात गेली अनेक वर्षे एकावर एक नाही, दोन नाही, तर अनेक फुकट गोष्टी मिळत आहेत. घराणेशाहीही याला अपवाद नाही. कलाक्षेत्रातील घराणेशाहीने जसा सर्वसामान्यांना आनंद दिला, तसाच राजकीय घराणेशाहीने मनस्तापही दिला. याच घराणेशाहीवर आधारित ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’चा दीपावली विशेषांक आहे. दीपक करंजीकरांच्या गांधी घराण्यापासून ते विश्वास नेरुरकरांचा सचिन देव बर्मन आणि आर.डी. बर्मन, मुंबईचे डबेवाले, मुघल घराण्याचा उदयास्त, टकले बंधू सराफी पेढी, संगीतमय मंगेशकर घराणे, कालाय तस्मै नम: अशा अनेक लेखांत घराणेशाहीवर प्रकाशझोत टाकला आहे.