Hard Copy Price:
10% OFF R 100R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रकृतिस्वास्थ्यासाठी वयानुसार योग्य आहाराची गरज असते. शारीरिक वाढ आणि व्यक्तिमत्त्वविकास परस्परावलंबी असल्याने, भावी यशस्वी जीवनाच्या दृष्टीने वाढीच्या वयात योग्य आहार विशेषच महत्त्वाचा ठरतो. आवश्यक ती पौष्टिक द्रव्ये आपल्याला नेहमीच्या आहारातून मिळू शकतात.
गरिबी हे कुपोषणाचे महत्त्वाचे कारण असले तरी आहाराविषयक अज्ञान, खाण्यापिण्यातील तर्र्हवाईकपणा, आहाराचा अतिरेक ह्या गोष्टीही बरेच वेळा कुपोषणाला कारणीभूत होतात. मुलामुलींना आहारविषयक शास्त्रीय माहिती त्यांना समजेल अशा पद्धतीने दिली तर ती रोजचेच जेवण न कुरकुरता घेतील. ही गोष्ट लक्षात घेऊन आहाराविषयक विविधांगी माहिती देणारे हे पुस्तक किशोरवयीन गटासाठी त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, त्यांना उद्देशूनच लिहिले आहे.
शास्त्रीय परंतु सोपी भाषा, साध्या आकृत्यांचा सढळ वापर, लहान-लहान प्रकरणे ही पुस्तकाची काही वैशिष्ट्ये. स्वच्छ सवयी, योग्य संस्कार, खाद्यवस्तूंविषयक सौंदर्यदृष्टी व तत्संबंधी छंद, मुलामुलींना त्यांच्या वयानुरूप पेलतील अशा कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्या यांचाही विचार पुस्तकात केला आहे.
हे पुस्तक गृहिणींनाही तितकेच उपयुक्त आहे. पुस्तकातील माहितीचा वापर करून त्या आहाराचा बेत जास्त डोळसपणे करू शकतील, जेवणात विविधता आणू शकतील. मोजक्या पैशातही पौष्टिक आहार आपल्या मुलामुलींना देऊ शकतील. शिक्षक, वसतिगृहांचे व्यवस्थापक, परिचारिका, वैद्यकीय समाजसेवक, प्रौढ साक्षर इत्यादींनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.