Summary of the Book
महाराष्ट्रातील घराघरांत राज ठाकरे यांचे नाव पोचले आहे. मराठी पाट्या, मराठी चित्रपटांना चित्रपटगृह आणि सध्या टोल वसूलीबाबत त्यांनी केलेली आंदोलने गाजली. काका बाळासाहेब ठाकरे यांचे बोट पकडून राजकारणाचे धडे घेतलेल्या राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापना केली आणि त्यांची राजकीय घौडदौड सुरु झाली. मराठी बाण्याचे राजकारण करीत असतानाच त्यांनी व्यंगचित्रकला आवर्जून जोपासली आहे. संगीतातही त्यांना रुची आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मनोज आवाळे यांनी मराठी मानाचा राजा मधून उलगडले आहेत. राज यांनी केलेली मनसेची जडणघडण, त्यांची गाजलेली भाषणे, विरोधकांना वेळोवेळी मारलेले टोले, चिमटे यात दिले आहेत. त्यांनी स्वतः काढलेली व्यंगचित्रे पाहण्याची संधी पुस्तकामुळे मिळते.