Summary of the Book
प्रेरणादायी पुस्तक मालिकेतील रॉबीन शर्मा यांचे हे पुस्तक. जीवन नव्याने जगण्यासाठी आणि 'स्व' शी सुसंवाद साधण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
प्रत्येकाला काही विशेष देणग्या लाभलेल्या असतात. त्या देणग्या ओळखायला शिकले पाहिजे. सुंदर नातेसंबंध निर्माण करायला हवेत. जीवनात पुन्हा मौज
यावी, जीवन सहासपूर्ण असावे यासाठी या पुस्तकात सल्ले दिले आहेत.
नवा प्रारंभ करण्यासाठी किंवा योग्य मार्गावर वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा, असे ते सांगतात. धुक्यातील रहस्यमय
वाटचाल, सागरकिनाऱ्यावरील विकास, सर्फिंग आणि आत्मप्रेम या प्रकरणांतून ते यशाकडे वाटचाल कशी करावी, हे सांगतात. आपले हृदय विशाल करा,
असा संदेश ते देतात.