Summary of the Book
पत्रकार सचिन परब यांनी आपल्या पत्रकारितेतील अनुभवाबद्दल आणि समाजातील काही घडामोडींवर भाष्य करणारे लेख आपल्या ब्लॉगवर लिहिले. या ब्लॉगमधील लेख या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. असा प्रयोग प्रथमच झाल्याचा लेखक आणि प्रकाशकांचा दावा आहे. पत्रकारितेतील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार झालेल्या परब यांनी त्याबद्दल जितक्या आपलेपणानं लिहिलं आहे, तितक्याच तडफेनं त्यांनी समाजातील विसंगतीवर बोट ठेवलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते अमर हबीब यांनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना पुरेशी बोलकी आहे.