Summary of the Book
यामध्ये चार एकांकिका असून त्या प्रकर्षाने प्रयोगप्रधान आहेत. त्या आशयघन आहेत. वरवर हसवत असताना काळीज कापत जाणारी धार त्यांना आहे. क्रौर्यामागून अलगदपणे वावरणारी तरल शोकात्मता आहे. त्यांचे खरे बळ त्यांच्या तंत्रकौशल्यात नसून या आशयात आहे. हे नाट्यलेखन व्यक्तिगत आहे आणि त्रि त्याला मिळालेल्या रंगमंचविषयक अचूक भानाच्या जोडीमुळे ते प्रेक्षकाला थेट भिडते. तंत्रावरची हुकूमत, कमालीचे साधे पण अति नाट्यमय संवाद या गोष्टी सोप्या नाहीत पण लेखक त्या उपजतच घेऊन आला आहे.