प्रवास करणे अनेकांना आवडते. त्यातही सहलीला जाण्यातील गंमत वेगळीच असते. देशांतर्गत व परदेशातील पर्यटनाला सध्या चांगले दिवस आहेत. दोन- चार दिवसांच्या सुटीतही 'छोटा ब्रेक ' घेता येतो. पर्यटनाला गेल्यावर खास करून परदेश असेल, तर तेथे काय पाहावे या माहितीसह. त्या ठिकाणची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, संबंधित देशांची निगडीत आठवणी याचे वर्णन व प्रवासानुभव सतीश गुप्ते यांनी 'माझी प्रवासगंगा' मधुन कथन केला आहे. चारी बाजूंनी शत्रू राष्टांनी घेरलेला चिमुकला इस्त्राईलची यशोगाथा यात आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेला जॉर्डन व पेट्रा शहर, प्राचीन वैभवशाली संस्कृती व पिरॅमिड्सचा वारसा असलेला इजिप्त या हटके देशांचे वर्णन यात आहे. त्याशिवाय नेपाळ, हाँककाँग , शेंजन, मकाऊ हे भारताजवळील देश, अमेरिका, युरोपसह फिनलंड, स्वीडन, नॉर्व, डेन्मार्कची सफरही यातून घडते. भारताचा मित्र देश असलेल्या रशियात वाचकांना फिरवून आणले आहे. प्रवासवर्णनासह विमानतळ, विमानप्रवास, हॉटेलमधील वास्तव्य आणि संपूर्ण प्रवासासंबंधी उपयुक्त सूचनाही लेखकाने दिल्या आहेत.
‘माझी प्रवासगंगा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5172916391861396739