Summary of the Book
सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांविषयी
पुस्तकाचे नाव 'सिनेमाची भाषा' असे असले तरी हा पीएच.डी.चा प्रबंध आहे आणि त्याचा मुख्य विषय आहे, 'सुमित्रा भावे यांच्या चित्रपट संहितांचा शोध घेताना'. मुखपृष्ठावर याचा उल्लेख केलेला नसला तरी तो आतील पानावर केलेला आहे. भावे यांच्या चित्रपटलेखनाची शैली आणि त्यांच्या चित्रपट संहिता यांच्याविषयी लेखिकेने काही निरीक्षणे, विशेष या पुस्तकात नोंदवले आहेत. भावे यांची चित्रपट कारकीर्द, जीवनमूल्ये, सांस्कृतिक संदर्भ, स्त्रीप्रतिमा या अनुषंगाने लेखिकेने हा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. भावे यांचे 'दोघी', 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'नितळ' हे चित्रपट आणि 'पाणी' , 'मुक्ती' यासारखे लघुपट या संदर्भातील हा अभ्यास वाचनीय ठरावा.