Summary of the Book
'मांग संस्कृती आणि भाषा 'या ग्रंथामध्ये प्रा . मोहन लोंढे यांनी मांग समाजाचा इतिहास ,त्यांची संस्कृती यांचा सविस्तर अभ्यास करून सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये आपले वेगळेपण जपताना या समाजाने आपली भाषा कशी गुप्त ठेवली ,याचे विवेचन केले आहे.हे विवेचन अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाचे तर आहेच;पण त्यापेक्षा मांग समाजाच्या गुप्त भाषेचे नमुने गोळा करून त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन या ठिकाणी केले आहे .प्रस्तुत विवेचनाला केवळ भाषिक विश्लेषणाचा संदर्भ नाही तर विश्लेषणामागे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाची जोडणी असल्यामुळे विवेचन अर्थपूर्ण झाले आहे.आज जगभरातल्या आणि महाराष्ट्रातल्याही अनेक बोलीभाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,त्या नष्ट होण्यापूर्वी त्यांचा अभ्यास व्हावा, किमान संकलन व्हावे, याचाच एक भाग म्हणून प्रस्तुत अभ्यास महत्त्वाचा आहे.