Summary of the Book
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे, आकर्षक रंगसंगती आणि उत्तम छपाई असलेले 'महाराष्ट्र देशा' हे पुस्तक महारष्ट्र राज्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने प्रकाशित करण्यात आले आहे. महाराष्ट्राची ही चित्रमय ओळख आहे. लोहगड, राजमाची, गोपाळगड, मल्हारगड, यांसारखे किल्ले, शनिवारवाड्यासारखी सांस्कृतिक ठिकाणे, उल्हास नदी, मिठी नदी, कृष्णा, मुठा, बाणगंगा, चंद्रभागा यांसारख्या महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नद्या, अमृतेश्वर मंदिर, कड्यावरचा गणपती, ज्योतिबा, कानिफनाथ मंदिर, वेळणेश्वर, श्रीगोंदेश्वर मंदिर अशी धार्मिक स्थळे असे महाराष्ट्राचे मानबिंदू ठाकरे यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहेत. एकीकडे मुंबईतील झोपड्या आणि दुसरीकडे शेतीचे आखीवरेखीव रूप ठाकरे यांनी दाखविले आहे. ही केवळ छायाचित्रे नाहीत, तर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक ओळख आहे.