Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me
Preview
Summary of the Book
‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्य्र.’’अशा दक्षिण कोकणातला एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चितारायला घेतला आहे. आणि एक मोठा कलात्मक चमत्कार म्हणजे या नापीक प्रदेशातून खळाळत्या प्रसन्न हास्याचे सोळा आणे पीक काढले आहे!
तर्हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक प्रदीर्घ पटच ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये दळवींनी उलगडीत नेला आहे. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर, आणि स्थितप्रज्ञ दारू-दुकानदार अंतोन पेस्तांव, गांधीवादी डॉ. रामदास आणि लोकलबोर्डात निवडून आलेला ‘बिचारा’ केशा चांभार, परस्परांशी तहाहयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली, दशावतारवाला जिवा शिंगी आणि ढब्बू पैसा खणकन वाजवून घेणारा दुकानदार नायक... एक की दोन - किती नावे सांगावी? शिवाय ही माणसे सुटेपणाने येत नाहीत.
सुरेख पुस्तकं, सूंदर लेखणी. एक एक वक्तीचे बारीक बारीक रूपं आणि त्यांचे स्वभाव दळवीनी बरोब्बर मांडले आहेत. शेवटी पुस्तकं वाचून झालं की नकळत मन आणि डोळे भरून येतात व पुन्हा स्वतःला प्रश्न विचारता की गावी पुन्हा कधी येणार आहेस कायमचा राहिला? मला अजून तरी मनाला उत्तर द्यायला सापडले नाही फक्त आठवणी मात्र मनात रेंगाळत राहतात, कारण खोटं उत्तर व वचन देऊन मी माझ्या गावाला आणि मनाला फसवू शकत नाही...
R D Kotwal
23/02/2020
I read the book in my college life and was highly impressed.it give every feeling of konkani life which I love very much.