Summary of the Book
संपूर्ण निरोगी आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ असावे लागते, असे मत व्यक्त करीत डॉ. अविनाश भोंडवे यांनी 'आरोग्याची गुरुकिल्ली'मधून आहार, व्यायाम, विश्रांती, लसीकरण, शारिरीक तपासण्या मानसिक स्वस्थता, सामाजिक आरोग्याचे भान या सहा गोष्टींवर आधारित निरामय जीवन कसे जगता येते याविषयी मार्गदर्शन केले आहे.
चौरस आहार, त्यातील शरीराला आवश्यक घटक, मुले, युवती, गर्भवती, एक वर्षापर्यंतच्या बाळाचा, ज्येष्ठांचा आहार, अन्नपदार्थांची निवड, फळे - भाज्या, तेल, तूप, चीज, लोणी, मीठ याची गरज, पाण्याचे महत्व, स्पष्ट केले आहे. व्यायामाची गरज, फायदे, व्यायामाचे प्रकार, करण्याची पद्धत, त्याविषयीची काळजी, विश्रांतीची आवश्यकता, झोपेचे आरोग्यावर होणारे बौद्धिक - मानसिक परिणाम, व्यवस्थित झोप येण्यासाठी महत्वाचे घटक, झोपेचे आजार, भविष्यात आजार होऊ नयेत म्हणून लसीकरणाचे महत्व,
राष्ट्रीय लसीकरण योजना, बालरोगतज्ज्ञ, परिषदेने, सुचविलेले लसीकरण, त्याची माहिती यात दिली आहे. शारिरीक तपासण्यांची गरज, सर्वसाधारण तपासण्या, निरोगी आरोग्यात मानसिक आरोग्याकडे कसे लक्ष द्यावे, मनःस्वास्थ्य बिघडल्याची कारणे यांची सविस्तर चर्चा यात केली आहे.