Summary of the Book
"विकिलीक्स' या वेबसाइटच्या माध्यमातून अनेक देशांची गुपिते मानवी कल्याणासाठी उघड करणारा ज्युलियन असांज याचे हे आत्मचरित्र.
शोध पत्रकरिता करताना असांज याने अनेक देशांच्या ऑफिशियल सिक्रेट्सचा पर्दाफाश केला. असांज याला अडकवण्यासाठी त्याच्यावर खोटे
आरोप ठेवून त्याला तुरुंगात ठेवण्यात आले.
पोलिस ससेमिरा त्यांच्या पाचवीला पुजलेला होता. आपले नाव गुप्त ठेवून, गुप्त माहिती देणाऱ्यांसाठीविकिलीक्स हे एक चांगले व्यासपीठ ठरले होते.
असांज यांना वैयक्तिक आयुष्यातही अनेक वादळांनातोंड द्यावे लागेल. सत्ताधारी मंडळी आणि बडे उद्योग यांचे लागेबांधे व त्यातून निर्माण झालेली गैरव्यवहाराची साखळी याचा गौप्यस्फोट असांज यांनीकेला.
"टाइम' साप्ताहिकाने त्यांना मॅन ऑफ द इयर म्हणून गौरवले होते. सुहास फडके यांनी या आत्मचरित्राचा अनुवाद अत्यंत ओघवत्या शैलीत केला आहे.