संगीत विद्यार्थ्याला संगीतशास्त्रा बदलची महत्वाची माहिती शिल्पा बहुलेकर यांनी 'कलाशास्त्र विशारद भाग २ (मध्यमा)' मधून मिळते. रागांची माहिती, मुक्त आलाप- ताना, तसेच विविध रागांमधील तुलना असे माहितीपूर्ण मुद्दे यात सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. भातखंडे व पलुस्कर लिपीबद्दलची माहितीही आहे. विविध तालांची दुगु -तिगुन, आड -कुआड आदींची गणितासहित लयकारी लिपीबद्ध करून ती भातखंडे -पलुस्कर दोन्ही लिपींत दिली आहे. रागपरिचय, रागांचे तुलनात्मक अध्ययन, राग ओळखण्यासाठी टीपा, निबंध, वाद्यांची चित्रांसहीत माहिती,पं. विष्णू नारायण भातखंडे, सम्राट तानसेन, पं. शिवकुमार शर्मा, मसितखाँ, गुलाम रजीखाँ यांची तसेच गोपाल नायक, आमीर खुसरो, मानसिंह तोमर, जयदेव, त्यागराज, पुरंदरदास आदी संगीतज्ज्ञांची जीवनचरित्रे, विविध लेख हेही मुद्दे यात समाविष्ट आहेत. संगीताच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील सर्वच मुद्दे या पुस्तकात आहेत. तसेच संगीताबद्दलची माहिती जाणून घेण्यास इच्छुकांना यातून माहिती उपलब्ध होईल. याच्या मराठी व हिंद्री आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.
‘कलाशास्त्र विशारद (भाग दोन)- मध्यमा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5420349425500299797