Summary of the Book
बहुसांस्कृतिक वातावरणातील ही कादंबरी अमेरिका आणि बहुतांश इराकमध्ये घडते. एन्की म्हणजे म्हणजे पुरातन सुमेरियन लोकांचा शास्ता देव आणो हे राज्य म्हणजे इराक हा देश.
इराकमध्ये आजही एन्कीच्या देवालयाचे काही अवशेष सापडतात. सिद्धहस्त लेखक विलास सारंग यांनी हे वेगळेच अनुभवविश्व उलगडले आहे. या कादंबरीतील पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत; परंतु कादंबरीच्या अखेरीला उल्लेखलेली अरब परराष्ट्रमंत्र्यांची बैठक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे, असे लेखक प्रारंभीच नमूद करतात.
लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा संघर्ष कादंबरीत वाचायला मिळतो. प्रमोद वेंगुर्लेकर या नायकाचा भौतिक आणि आधिभौतिक प्रवास, मूल्यांचा संघर्ष, अभिव्यक्ती, अस्तित्व कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत.