Summary of the Book
एकादशी दुप्पट खाशी, अशी म्हण आहे; पण त्याचे वाईट का वाटून घ्यायचे? उपवासाच्या दिवशी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खायला मिळत असतील, तर रसना तृप्त का करू नये? उपवासाचे असे किती नाना पदार्थ असू शकतात, हे उर्मिला पंडित यांच्या या पुस्तकातून समजते. तिखट, गोड, केळ्याचे, रताळ्याचे, टिकाऊ अशा पाच विभागात त्यांनी उपवासाचे १०० प्रकार दिले आहेत. उपवासाचे मोदक, वडे नी गुलाबजामही करता येतात, हे त्यातून समजते.
कमला गोडबोले यांनी 'महाराष्ट्रीय खास पदार्थ' या पुस्तकात चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, आमटी, पातळ भाज्या, पिठले, खमंग भात, खमंग पक्वान्ने, पुडिंग, मधल्या वेळेचे पदार्थ, धिरडी असा जंगी मेनू सदर केला आहे. एवढेच नव्हे, तर मसाला सुपारी, मेतकुट, लोणची-मिरच्या नी पापड असा साग्रसंगीत स्वयंपाक कसा करायचा, याचे मार्गदर्शन केले आहे. सजावटीचे महत्व सांगायलाही त्या विसरत नाहीत.