Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनास ३५० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रामधून डॉ सदानंद मोरे यांनी तुका म्हणे हे सदर वर्षभर लिहिले .तेच सदर तुका म्हणे या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले .या पुस्तका मागची लेखकाची भूमिका स्पष्ट करणारा प्रस्तावनेतील हा काही भाग -
या अभंगांची निवड केवळ अध्यात्मिक व पारमार्थिक दृष्टीकोनातून केलेली नसून तुकोबांच्या विचारांचे व व्यक्तित्वाचे अनेक पैलू दिसावेत अशा तऱ्हेने केलेली आहे .या पैलुंचाच प्रभाव मराठी संस्कृतीवर आहे .प्रयत्न ,प्रतिभा आणि प्रसाद अशी तीन काव्य कारणे असल्याचे प्रतिपादन प्राचीन काव्य मिमान्साकांनी केले आहे .मात्र प्रासादिक कवींची उदाहरणे फारशी आढळत नाहीत तुकोबा आपली कविता प्रसादातून निर्माण झाल्याचे सांगतात .हा प्रसाद देवाचा व संतांचा असा दुहेरी आहे .
तुकोबांच्या वचनांना समकालीन गुणग्राहक लोक तुकाराम वेद म्हणू लागले होते त्यामुळे व ‘ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ‘ अशा तुकोबांच्या आव्हानात्मक अभिव्यक्तीमुळे सनातनी पंडितांचा रोष होणे साहजिकच होते .पण त्यातून तुकोबांचे व्यक्तित्व तावून सुलाखून झळाळून बाहेर पडले . त्याची लोकप्रियता एवढी होती कि सालोमालो सारख्याला त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही .’अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ असे समीकरण रूढ झाले .’तुकारामाचे अभंग लाघवी रामा मजेवरी गात जा ‘ असे सगन भाऊ आपला साथीदार राम गोंधळी याला सांगतो तर दुसरीकडे मोरोपंतांसारखा संस्कृत निष्ठ कवी सुध्दा तुकोबांच्या अभंगाशिवाय किर्तनच शक्य नाही अशी भूमिका घेतो
तुकोबांचे हे आकर्षण इंग्रजी काळातही टिकून राहिले . प्रार्थना समाजाच्या रानडे भांडारकर यासारख्या धुरिणांनी आपल्या नव भागवत संप्रदायाची उभारणी तुकोबांच्या अभंगाच्या आधारे करून तुकोबा जगदगुरू असल्याचे घोषित केले .स्वातंत्रोत्तर काळात तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांसारख्या वैश्विक जाणीवेच्या कवीने तुकोबांचे कवी म्हणून जागतिक पातळीवर स्थान किती वरचे आहे याचे दर्शन घडवले .वारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही सार्या सीमा ओलांडून वैश्विक आवाहन क्षमता असलेल्या तुकोबांच्या अभंगाचे हे एक ओझरते दर्शन .