Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
दक्षिण कोकणात एक गाव जयवंत दळवींनी या कादंबरीत चितारलेला आहे. तऱ्हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक पटच 'सारे प्रवासी घडीचे' मध्ये उलगडत जातो. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर. स्थितप्रज्ञ दारू- दुकानदार अंतोन पेस्तांव. गांधीवादी डॉ. रामदास आणि लोकल बोर्डात निवडून आलेला 'बिचारा ' केशा चांभार, परस्परांशी तहहयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली, दशावताराला जिवा शिंगी आणि ढब्बू पैसा खणकन वाजवून घेणारा दुकानदार नायक... एक की दोन- किती नावं सांगावी? शिवाय हि माणस सुटेपणाने येत नाहीत. खळनाथाचे देऊळ, त्याचा उत्सव, प्राथमिक शाळा, दारूचे छप्पर, रविवारचा बाजार, मोटारसर्विस, होळीचा सण, गंगू भाविणीचे घर यासारखी स्थळे आणि प्रसंग यांची जिवंत चौकट त्यांना लाभली आहे. अगदी स्वाभाविक वातावरणात नि:शंकपणे, आपापल्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागणारी हि माणसे आहेत. म्हटले तर हे आत्मचरित्र आहे. म्हटले तर व्यक्तिचित्रे आहेत, म्हटले तर विनोदी गप्पागोष्टी आहेत, म्हटले तर कादंबरी आहे- काहीही असले तरी पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटणारे, आणि हसवता हसवता खिन्न करणारी ही एक अविस्मरणीय कलाकृती आहे.