Summary of the Book
डॉ. शैलेश त्रिभुवन यांचा आईचं स्मरण करणारा हा काव्यसंग्रह आईचं सारं आयुष्य विविध कवितांमधून मांडतो. स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरचे क्षण अत्यंत तरलपणे यातील कवितांमध्ये मांडले आहेत. आईच्या 60 वर्षांच्या आयुष्यात तिनं 43 वर्षं माझ्यासाठीच कष्ट घेतले, असं त्रिभुवन सांगतात आणि आईनं जे माणूसपणाचे संस्कार केले, त्याचा आढावा कवितांमधून घेतात. यांतील 82 कवितांमधून कवी जगण्याची लढाई मांडतात. ज्या संवेदनशीलतेनं ते आईचं रूप रेखाटतात, त्यामुळं यातील कविता दीर्घ काळ मनात रेंगाळतात.