Summary of the Book
भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणीही झाली तेव्हपासून भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नाची भिंत उभी राहिली. काश्मीर मध्ये शांतता नांदण्यासाठी, भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी, काश्मीर, 'इन्सानियत आणि संवाद' या त्रिसूत्रीचा आधार घेतला. त्यांच्या कार्यकाळात कसे प्रयत्न झाले याची माहिती ए. एस. दुलत यांनी 'काश्मीर वाजपेयी पर्व' मध्ये दिली आहे.
गुप्तचर विभागात (आयबी) सेवेला प्रारंभ केलेले दुलत हे 'रॉ' या भारताच्या गुप्तवार्ता संस्थेतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची पंतप्रधान कार्यालयात काश्मीर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. काश्मीर हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय.
नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर मधील परिस्थिती निवळण्यास सुरवात झाली. त्यासाठी केलेले प्रयत्न, भारताने साधलेल्या संधी, हातातोंडाशी येऊनही निसटलेले महत्वाचे क्षण याचे कथन लेखकाने केले आहे. पाकिस्तान हुर्रियत कॉन्फरन्स सारख्या फुटीरतावाद्यांबरोबरच दहशतवाद्यांशी संवाद साधण्याची गरजही व्यक्त केली आहे. याचा मराठी अनुवाद चिंतामणी भिडे यांनी केला आहे.