Summary of the Book
लोणावळा-खंडाळा म्हटले, की पावसाळ्यात केलेली सहल बहुतेकांना आठवते. हिरवीगार वनराई, स्वच्छ हवा, डोंगरदर्यातून खळखळणारे धबधबे यामुळे येथील वातावरण चिंब झालेले असते. त्याचबरोबर येथील वनसंपदा पशू-पक्षी, सरी-सृप यांनी संपन्न आहे. मात्र याकडे फारसे पर्यटक वळत नाहीत. येथील प्राणी-पक्षी यांचे वैभव ‘पक्षी लोणावळा खंडाळ्याचे’मधून उजेडात आणले आहे सतीश पांडे, विवेक विश्वासराव, निरंजन संत व प्रमोद देशपांडे यांनी निसर्गप्रेमातून हे पुस्तक तयार झाले आहे.
अचूक माहिती, उत्कृष्ट छायाचित्र हे याचे बलस्थान आहे. आटोपशीर आकारामुळे या परिसरात फिरताना पुस्तक जवळ बाळगणे सोपे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पश्चिम घाटात वसलेल्या वनसंपदेतील या वैभवाची माहिती म्हणजे वन्यप्रेमी व सामान्य वाचकांसाठी खजिना आहे.